
इस्लामाबाद : रिझवान अख्तर यांची पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स’ (आयएसआय) या गुप्तचर संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पाकिस्तान गुप्तचर संस्थेच्या अध्यक्षपदी रिझवान अख्तर
अख्तर हे येत्या १ ऑक्टोबर रोजी पदभार स्विकारणार असून पाकिस्तानात ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेला महत्वाचे स्थान आहे. परराष्ट्र धोरण, राजकारण आणि लष्कराच्या दृष्टीने या संस्थेचे प्रमुखपद अत्यंत महत्वाचे मानले जाते. ही संस्था थेट पंतप्रधानांना अहवाल पाठवित असल्याची माहिती लष्करी अधिका-यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
