राष्ट्रवादीची काँग्रेसला शेवटची ऑफर

aaghadi
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने नरमाईची भूमिका घेत काँग्रेस सोबत १३० जागांवर आघाडी करण्यास तयार असून काँग्रेस मात्र १२४ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही.

आता १३० जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपुढे ठेवला असून १३० जागा द्या आणि आघाडी करा असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

मात्र, काँग्रेसला राष्ट्रवादीची ही मागणी मान्य नसून, काँग्रेस १२४ च्या खाली जागा देण्यास राजी नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सध्या मुंबईत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. तर, उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक होणार आहे.

Leave a Comment