
मुंबई – राष्ट्रवादीचे विद्यमान राज्यमंत्री आणि एका आमदाराने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे एक विद्यमान मंत्री आणि आमदार भाजपत दाखल
राज्यमंत्री संजय सावकरे आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची साथ धरली आहे.
संजय सावकारे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला जळगावात मोठा फटका बसणार आहे. भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांनी भाजपत अधिकृत प्रवेश केला.
