
नवी दिल्ली – सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच ‘गॅलेक्सी कोर २’ सह आणखी काही मोबाईलची किमत कमी केली होती. त्यानंतर आता सॅमसंगचा आणखी एक फोन स्वस्त केला असून आपल्या ‘गॅलक्सी एस ड्यूओस ३’ या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.
‘गॅलक्सी एस ड्यूओस ३’ झाला स्वस्त
याच महिन्यात सॅमसंगने आपला ‘गॅलक्सी एस ड्यूओस ३’ हा फोन ८, १५० रुपयांना लाँच केला होता. मात्र, आता सॅमसंगच्या ऑफिशल स्टोरमध्ये हा फोन ७, ४९७ रुपयांना मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वीच सॅमसंगने आपल्या ‘गॅलेक्सी कोर २’ या फोनची किंमतीत ३,९०० रुपयांची कपात केली आहे. जुलैमध्ये सॅमसंगने ‘गॅलेक्सी कोर २’ हा फोन ११ हजार ९०० रुपयांना लाँच केला होता. हा फोन आता जवळपास ८ हजार रुपयांना मिळत आहेत.
