वादग्रस्त नेते ओवसींविरोधात गुन्हा दाखल

akbaruddin
मुंबई – आग्रीपाडा पोलिसांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद उल मुसलमिनचे वादग्रस्त नेते अकबरुद्दीन ओवेसी याच्या विरोधात परवानगीशिवाय जाहीर सभा घेणे आणि पदयात्रा काढणे या कृत्यांबद्दल गुन्हा नोंदविला आहे.

एमआयएम पक्षाचे आमदार अकबरूद्धीन ओवेसी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मुस्लीमबहुल भागात आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी त्यांनी मुंबईत बैठका आणि मेळाव्यांचा सपाटा लावला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत आलेल्या ओवेसीने १९ सप्टेंबर रोजी आग्रीपाडा भागातील अरब मशिदीला भेट दिली. त्यावेळी परवानगी नसतानाही ओवेसी याने अरब मशिद ते लकी गार्डनपर्यंत सुमारे ३०० कार्यकर्त्यांच्या सोबत पदयात्रा काढल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळाही झाला. ओवेसी यांचे हे कृत्य कायद्याचे उल्लंघन करणारे असून बॉम्बे पोलिस अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरज भासल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली.

Leave a Comment