
औरंगाबाद – विधानसभा निवडणुकींची जशी घोषणा झाली तेव्हापासून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून ५५ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
घोडेबाजार जोरावर; आणखी ५५ लाखांची रोकड हस्तगत
ही कारवाई निवडणूक विभागाने केली असून कन्नड येथील पाणपोई फाट्याजवळून ही रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
ही रोकड दिल्ली पासिंग असलेल्या गाडीतून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
