
कराची – शनिवारी बलुचिस्तान भागात पाकिस्तानच्या लष्कराचे एमएफआय-१७ मुश्शाक हे विमान कोसळले असून या अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहे.
पाकिस्तानात कोसळले लष्कराचे विमान
पाकिस्तानी अधिका-यांनी झिरत पर्वतरांगांजवळ हे विमान कोसळले असून यामध्ये दोन वैमानिक जखमी झाल्याची माहिती दिली. जखमींना जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नसून यासंबंधी अधिक तपास सुरु आहे. मुश्शाक हे विमान शिकाऊ वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाते.
