राष्ट्रवादीला सुरुंग लावणार उदयनराजे ?

udyanraje
सातारा – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचे संकेत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले असून उदयनराजे पक्षावर नाराज असल्यामुळे लवकरच राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे.

फक्त खासदार एवढच पद राष्ट्रवादीत माझ्याकडे आहे. त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप, उदयनराजेंनी पक्षावर केल्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे पत्रक उदयनराजेंनी प्रसिद्ध केले आहे.

उदयनराजेंच्या साताऱ्यातील ‘जलमंदिर पॅलेस’ ह्या संपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. केवळ उदयनराजेंचे कार्यकर्ते म्हणून विकासकामांबाबत आपली जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली. लवकरच तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करून त्यांच्या भावनांचा आदर राखला जाईल, असा निर्णय घेईन”, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना दिलासा दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment