भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक केळकर यांचे निधन

ashok-kelkar
औरंगाबाद – शनिवारी औरंगाबाद येथे सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने भाषातज्ज्ञ डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. औरंगाबादेतील त्यांची कन्या रोशन रानडे यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून ते राहत होते. केळकर यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. भाषाशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, सांस्कृतिकशास्त्र जीवशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्यांचा मूलगामी व्यासंग होता.

डॉ. अशोक केळकर यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. विविध विषयांच्या गाढ्या अभ्यासातून मिळवलेली भाष्य करण्याची ताकद आणि स्वतंत्र विचार मांडण्याची बौद्धिक क्षमता यामुळे भाषाक्षेत्रात डॉ. केळकर यांचा शब्द प्रमाण मानला जाई. हिंदी, इंग्रजी आणि मराठीमध्ये त्यांनी निर्माण करुन ठेवलेली विपुल ग्रंथसंपदा याची साक्ष देणारी आहे. भाषा विषयातील कार्याबद्दल भारत सरकारने डॉ. केळकर यांना २००२ मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविले.