तिसरा महाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन

chagan-bhujbal
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला मागील काही दिवसांपासून लागलेल्या गळतीला मोठा दिलासा मिळाला असून आता राष्ट्रवादीतील आउटगोईंग बंद होऊन इनकमिंग सुरु झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मालेगावमधील तिसरा महाज पक्ष विलीन झाला असून मालेगावचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तसेच मालेगाव विकास आघाडीचे सुनील गायकवाड यांच्यासह ४ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे.

यांच्यासह ठाण्याचे माजी महापौर नईम खान यांनी देखील राष्ट्रवादीची साथ धरली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्या उपस्थित या सर्वानी पक्षात प्रवेश केला.

येत्या काही दिवसात मालेगावात मेळावाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचाराचा लवकरच शुभारंभ होणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.