
साना – बंडखोर आणि लष्कर यांच्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत लष्करी जवानांसह ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आठ सर्वसामान्य नागरिक आहेत.
लष्कर आणि बंडखोराच्या धुमश्चक्रीत ७१ ठार
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवडयापासून सानाच्या काही भागांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाल्यामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांना आपले घरे-दारे सोडून जाण्याची वेळ आली. बंडखोरांनी गेल्या गुरूवारी येमेनच्या सरकारी दुरचित्रवाणीच्या कार्यालयावर गोळीबार करण्यास सुरूवात केली होती. त्याला स्थानिक लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. या वेळी दोन्ही बाजूमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. त्यात 30 जवानांसह 71 जण ठार झाले. यामध्ये आठजण सर्वसामान्य नागरिक आहेत.
