
बीड- बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या अकल्पित निधनामुळे रिकामी झालेली लोकसभेची जागा त्यांची द्वितीय कन्या प्रीतम खाडे मुंडे लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी हे संकेत स्पष्टपणे दिले आहेत. पंकजा भाजप कोअर मसिटीच्या सदस्याही आहेत.
बीडची जागा मुंडे कन्या लढविणार
आपल्या संघर्ष यात्रेची सांगता बीडमध्ये करताना पंकजा यांनी बीडची जागा मुंडेच लढविणार असल्याचे जाहीर केले होते. या जागेसाठी १५ आक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. मुंडे यांच्या या जागेसाठी पंकजा लढणार की प्रीतम लढणार याविषयी चर्चा सुरू होती. पंकजा यांनी केंद्रात जावे असेही मत व्यक्त केले जात होते मात्र पंकजा यांनी राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला असल्याने ही जागा प्रीतम लढविणार असल्याचे पंकजा यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
बीडमध्ये संघर्ष यात्रेची समाप्ती करताना पंकजा यांना वडिलाच्या आठवणीने गहिवरून आले व त्याच भावनेने त्यांनी उपस्थितांना मते देण्याचे आवाहनही केले.
