थर वाळवंटात नवीन तेल साठे मिळाले

crain
बाडमेर- राजस्थानच्या थर वाळवंटात बाडमेर आणि जालौर भागात तेलशोध मोहिम राबवित असलेल्या केयर्न इंडिया कंपनीला नवे तीन तेलसाठे मिळाले आहेत. कंपनीने ही घोषणा नुकतीच केली आहे. आत्तापर्यंत या कंपनीने या भागात ३६ तेलसाठे शोधले आहेत.

केयर्न इंडियातील अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाडमेर हिल या २१ किलोमीटर परिसरातील तेल भंडारातून म्हणजे डीपी १ मधून दररोज १२० बॅरल म्हणजे १४३०८ लिटर तर सरस्वती एसडब्ल्यू १ मधून दररोज २४८ बॅरल म्हणजे २९५७१ लिटर तेल निघू शकणार असून त्याचे उत्पादन लवकरच सुरू केले जात आहे.