
मुंबई – दिवसेंदिवस महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कमी होण्याऐवजी वाढताना दिसत असून शिवसेनेकडून स्वतंत्र निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू झाल्याच्या बातम्या आल्यावर, आता भाजपनेही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शिवसेनेचा भाजपसाठी जास्त जागा सोडण्यास नकार
काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडींनी १३५ जागांची अपेक्षा जाहीर केली आहे. घटक पक्षांना जागा दिल्यावर उरलेल्या जागा निम्म्या निम्म्या वाटून घ्याव्यात, असा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर ठेवल्याचे रुडींनी स्पष्ट केले आहे. तिकडे शिवसेनेने १५० पेक्षा एकही कमी जागा घेणार नाही, असे आधीच म्हटले आहे.
