नारायण राणे यांच्या जागेवर शिक्कामोर्तब

narayan-rane
कणकवली : कुडाळमधून उद्योग मंत्री नारायण राणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती स्वत: नारायण राणे यांनीच दिली असून कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचेही राणेंनी म्हटले आहे. काँग्रेसची पहिली यादी १७ सप्टेंबरला जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिली आहे.

विधानसभा निवडणूकीच्या तारखा दोनच दिवसांपूर्वी जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर सर्वच पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या तयारीला लागल्याचे सध्या चित्र असल्यामुळे काँग्रेस देखील या धामधुमीत मागे नसल्याचे राणेंनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आघाडीतील जागावाटपाचा गुऱ्हाळ आणखी सुटले नसल्याने या यादीत काँग्रेसच्या कुठल्या जागांचा समावेश होतो, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment