जागतिक बँक करणार मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना सहकार्य

mumbai-metro
मुंबई – चारकोप-दहिसर मानखुर्द हा प्रकल्प पर्यावरण खात्याची परवानगी व इतर अडचणीत अडकला असून एमएमआरडीएने वडाळा-कासारवडवली हा मेट्रो ४ हे दोन्ही ४० किमीचे प्रकल्प एकत्रित भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रकल्पाचा तिढा सुटणार आहे. त्यातच जागतिक बँकेने मेट्रो-३ ला जायकाने कमी व्याजदरात कर्ज देण्याचे मान्य केल्यानंतर आता मेट्रो २ लाही कर्ज देण्यात स्वारस्य दाखवल्यामुळे मेट्रोचे दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत.

मागील महिन्यात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ चे भूमिपूजन झाले. या प्रकल्पासाठी जपानच्या जायका कंपनीने २३ हजार कोटी रुपयांचे कर्ज कमी व्याज दराने देण्याचे मान्य केले आहे. आता मेट्रो २ लाही जागतिक बँकेने कर्ज देण्याचे स्वारस्य दाखवले आहे. जायकाने यापूर्वी ट्रान्सहार्बर हा ९ हजार ६३० कोटी रुपयाच्या प्रकल्पाला व आता वांद्रे-वसरेवा सी-लिंक प्रक ल्पालाही जायकाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

चारकोप-वांद्रे-मानखुर्द प्रकल्पाच्या कारशेडसाठी निर्धारित केलेली जागा सीआरझेडमध्ये येत असल्याने त्यात पर्यावरण खात्याची मान्यता मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे हा प्रकल्प आता संपूर्णपणे भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो २ व मेट्रो ४ हा प्रकल्प एकत्रित रिंगरुट करण्याचा निर्णय राज्य सरकोरने घेतल्याने रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

Leave a Comment