
मुंबई – विधानसभा निवडणुकांचे राज्यात बिगुल वाजले असून शिवसेनेला मुंबईतील डबेवाल्यांनी पाठिंबा दर्शवत प्रचाराला सुरूवात केली आहे.
शिवसेनेला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठींबा
मुंबईच्या डबेवाल्यांसाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्युमेंटमध्ये कोट्यावधींच्या निधींची तरतूद केली आहे. एखाद्या राजकीय पक्षाने पहिल्यांदाच डबेवाल्यांसाठी निधीची तरतूद केली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यामातून शिवसेना मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
शिवसेनेचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आता डबेवाल्यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर करत प्रचार सुरु केल्याने याचा चांगलाच फायदा सेनेला होणार आहे.
