विधानसभा निवडणूकांमुळे कोलमडणार परिक्षेचे वेळापत्रक

exam
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून परिक्षेच्या दिवशीच निवडणूका येत असल्याने परिक्षेचे वेळापत्रक कोलमडणार असून शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांना त्याचा फटका बसणार आहे.

राज्यात विधानसभेची निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी होत असून याच दिवशी बारावीच्या इंग्रजी साहित्य आणि शिक्षणशास्त्र या दोन विषयांची परीक्षा होणार असल्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी चांगलेच धास्तावले आहेत. त्याचबरोबर निवडणूक कालावधीतच शालेय विद्यार्थांच्या सहामाही, दहावी, बारावी आणि पदवी परीक्षा येत असल्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

दरम्यान, निवडणूक कालावधीत येणा-या परिक्षांच्या तारखा मागे किंवा पुढे ढकलण्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment