बीडमधून लोकसभेची निवडणूक लढणार नाही – पंकजा मुंडे

pankaja-munde
नाशिक – परळीच्या आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुकीत उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केले. बीडमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्याने पोटनिवडणूक होत आहे.

१५ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच मतदान होत असून भाजपकडून यासाठी पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात काम करणार असल्याचे पंकजा यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा सुरु केली आहे. आतापर्यंत त्यांनी १४ दिवसांमध्ये तीन हजार किलो मीटर प्रवास केला असून त्यात २१ जिल्ह्यातील ७१ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Leave a Comment