२६ व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उदघाटन

pune-festival
पुणे – सांस्कृतिक शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ख्याती असून या सांस्कृतिक शहराला जागतिक सांस्कृतिक शहर म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी पुणे फेस्टिव्हलने प्रयत्न केले आहेत. माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा पुणे शहराला सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यात सिंहाचा वाटा असल्याचे मत राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी २६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अभिनेत्री हेमामालिनी, करिश्मा कपूर, ईशा कोप्पीकर, बिंदू, जितेंद्र, सचिन पिळगावकर, रझा मुराद, आफताब शिवदासानी, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक राहुल बजाज, खासदार रजनी पाटील, खासदार शिवाजी आढळराव पाटील, सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, दिलीप पाडगावकर, धर्मस्थळ वीरेंद्र हेडगे, सुशील मेहनुब उपस्थित होते.