मोदी लाटेवर विसंबून राहू नका : भाजप अध्यक्ष

amit-shah
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही आपल्याला मोदी लाटेचा फायदा होईल असे समजू नका. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर कार्यकत्यांनी हल्ला करावा, अशा सुचना भाजपा कार्यकर्त्याना दिल्या आहेत.

याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द झाले असून मुंबईत पार पडलेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शाह यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना केल्या. लोकसभेत मोदी लाटेचा पक्षाला फायदा झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर अवलंबून राहू नका, असा इशारा शाह यांनी दिला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना निवडणुका जिंकण्याचा कानमंत्रही दिला. यावेळी भाजपाचे राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. एकुणच शाह यांचा मुंबई दौरा भाजपा कार्यकर्त्यांसाठी उपदेशपूर्ण ठरल्याची चर्चा आहे.

Leave a Comment