
इस्लामाबाद- चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या महिन्यात होत असलेला पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण दौरा रद्द केला असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राजकीय संकट यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शी जिनपिंग यांचा पाक दौरा रद्द
विदेश मंत्रालय प्रवक्त्याने हा दौरा होणार असे जाहीर केले होते मात्र त्यापाठोपाठ लगेचच दौरा रद्द केल्याची बातमी पाकच्या दुनिया टिव्हीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या हवाल्याने दिली आहे. चीनचे राष्ट्रपती लाहोर येथे पाक नेत्यांना भेटू शकतील असे पाक कडून सुचविले गेले होते आणि बैठकीची सर्व तयारी पूर्णही केली गेली होती. मात्र बिजिंगने या बदललेल्या कार्यक्रमाला सहमती न दर्शविल्याने हा दौरा रद्द करण्यात आला असे समजते.
या दौर्याची तयारी गेले कित्येक महिने सुरू होती. पाकसाठी हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण होता कारण या दौर्यात उर्जा तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विकास योजनांच्या सहकार्य करारावर स्वाक्षर्यात केल्या जाणार होत्या असेही समजते.
