मारूती रूपयांत देणार सुझुकीला रॉयल्टी

suzuki
देशातील बडी वाहन कंपनी मारूती सुझुकी भविष्यातील मॉडेल्ससाठी पेरंट कंपनी सुझुकी मोटर कॉर्पला भारतीय रूपयांत रॉयल्टी देणार आहे. यापूर्वी ही रॉयल्टी जपानी येन मध्ये दिली जात होती. मात्र चलन विनियमात सतत होत असलेल्या चढउतारांमुळे यापुढे ही रॉयल्टी रूपयांतच दिली जाणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले. अर्थात भविष्यात कंपनी कोणती मॉडेल्स आणणार याविषयी त्यांनी कांहीही माहिती दिली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने संशोधन विकास क्षमता वाढविली असून भविष्यातील मॉडेल्ससाठी संशोधन विकासाचे काम सुझुकीबरोबर भारतातील केंद्रातच केले जाणार आहे. दोन्ही कंपन्या मिळून नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करणार आहेत. त्यामुळे भारतात संशोधन विकासाचे झालेले काम, त्यासाठी आलेला खर्च याचा विचार करूनच रॉयल्टी दिली जाणार आहे. मारूतीने संशोधन विकास प्रकल्पांसाठी २ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. त्यात हरियानातील रोहटक येथील टेस्ट ट्रॅकचाही समावेश आहे. नजीकच्या काळात मारूती एसयुव्ही क्षेत्रात उतरणार असल्याचेही सांगितले जात आहे.

कंपनीने जून २०१४ ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत सुझुकीला ६८९ कोटी रूपयांची रॉयल्टी दिली असून हे प्रमाण एकूण विक्रीच्या ६.२ टकके इतके आहे.

Leave a Comment