
बर्मिगहॅम – मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक मा-यामुळे भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाला केवळ २०६ धावा करता आल्या. भारताकडून शमीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर इंग्लंडकडून मोईन अलीने ६७ धावा केल्या.
भारतापुढे इंग्लंडचे २०७ धावांचे आव्हान
तत्पूर्वी इंग्लंडने आजच्या महत्वपूर्ण सामन्यात तीन बदल केले. दुखापतग्रस्त इयन बेलच्या जागी गॅरी बलान्स, जेम्स ट्रेडवेलच्या जागी ऑफस्पिनर मोइन खान तसेच बेन स्टोक्सच्या जागी हॅरी गुर्नीला संधी दिली असून भारताने एकमेव बदल करताना मध्यमगती मोहित शर्माच्या जागी मुंबईकर धवल कुलकर्णीला अंतिम संघात स्थान दिले. या लढतीद्वारे धवलने एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे.
