आत्मचरित्र लिहिणार मास्टरब्लास्टर

sachin-tendulkar
नवी दिल्ली – क्रिकेटचा देव म्हणून ज्याची पूजा होते, तो देव आता स्वत:चे आत्मचरित्र पुस्तकातून उलगडणार असून विशेष म्हणजे खूद्द सचिन तेंडुलकर त्याचे आत्मचरित्र लिहिणार आहे आणि सचिनच्या या आत्मचरित्राचे प्रकाशन ६ नोव्हेंबर रोजी दिमाखदार सोहळ्यात होणार आहे.

मुंबईतील मैदानापासून सातत्त्यपूर्ण खेळी करत देशविदेशातील मैदान गाजवणा-या सचिन तेंडुलकरने सातत्त्यपूर्ण खेळी करत क्रिकेटवर आपली वेगळीच छाप पाडली आहे. त्यामुळे त्याचा हा जीवनप्रवास तितकाच प्रेरणादायी असणार आहे. सचिन तेंडूलकर हा प्रवास ‘प्लेईंग इट माय वे’ या आत्मचरित्रातून उलगडणार आहे. ‘या आत्मकथेद्वारे आजपर्यंत कोणालाची माहित नसलेले आयुष्यातील काही प्रसंग सर्वांसमोर मांडणार आहे असे सचिन सांगतो. क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच लिखाण करतानाही मला प्रामाणिकपणा दाखवावा लागेल हे सांगायला तो विसरत नाही. माझा तीन दशकांचा प्रवास एका पुस्तकात मांडणे कठीण असले तरी माझ्या चाहत्यांसाठी मी हे आव्हान स्वीकारले असे सचिन नमूद करतो.

या पुस्तकाचे प्रकाशक होडर अँड स्टेनन हे आहेत. याविषयी माहिती देताना प्रकाश ब्लूम फिल्ड म्हणाले, सचिनची आत्मकथा नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. भारत आणि जगभरात एकाच वेळी या पुस्तकाचे प्रकाशन होईल.

Leave a Comment