राज्य सरकारला सी लिंकच्या सुरक्षेबाबत नोटीस

sea-link
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे – वरळी सी लिंकच्या सुरक्षेबाबत गृहखाते, एमएसआरडीसी आणि कंत्राटदार कंपनी एमईपी यांना नोटीस बजावली असून उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. सी लिंकवर होत असलेल्या आत्महत्यांबाबत आज न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यावरील सुनावणी दरम्यान सरकारने नोटीस बजावली आहे. सी लिंकवरून सातत्याने होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने काय केले असे याचीकाकर्त्याने या याचिकेत म्हटले आहे.

Leave a Comment