लालबागच्या राजाचे २५ लाख भविकांनी घेतले दर्शन

lalbaugcha
मुंबई – गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासूनच मुंबईत संततधार पाऊस पडत असली तरीही लालबागच्या राजाच्या चरणी असंख्य भाविकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. सामान्य नागरिकांसह अनेक मान्यवरही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असून दरवर्षी लालबागच्या राज्याच्या चरणी लाखोंचे दान भाविक करत असतात.

lalbaugcha1

आतापर्यंत राजाच्या दानपेटीत ८० लाखांची माया जमा झाली असून भक्तांनी २ किलो सोने आणि १७ किलो चांदी लालबागच्या राजाला अर्पण केली आहे. आतापर्यंत २५ लाखांहून अधिक भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.