पूर्वपदावर आली मुंबईची लाईफलाईन

mumbai-local
मुंबई- मुंबईच्या दिशेने येणा-या धीम्या मार्गावरील मुलुंड आणि घाटकोपर दरम्यान तुटलेली ओव्हरहेड वायर जोडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे.

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत घाटकोपरजवळ मुंबईच्या दिशेने येणा-या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती . मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये तुडूंब गर्दी झाली होती.

बिघाड दुरुस्त होईपर्यंत कांजुरमार्ग आणि नाहूर स्टेशनवर गाड्या थांबणार नाहीत, अशी घोषणा मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात येत होती. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने माटुंगा ते मुलुंड दरम्यान बेस्टच्यावतीने अतिरिक्त गाड्या सोडण्याची विनंती केली. त्यानुसार बेस्टने कांजुरमार्ग आणि नाहूर स्टेशनवरुन जादा गाड्यांची सोय केली.

मात्र ऐन गर्दीच्या वेळेतच ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. उपनगरीय गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.

Leave a Comment