
टाटा व्हॅल्यू होम्स या रियल इस्टेट फर्मने आपल्या परवडणारी घरे योजनेतील घरे विक्रीसाठी ई कॉमर्स क्षेत्रातील कंपनी स्नॅपडीलशी भागीदारी केली आहे. ग्राहकांना ही घरे ऑनलाईनवरून खरेदी करता येणार आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगलोर आणि चेन्नई या शहरात १० हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.१ बेडरूम ते ३ बेडरूम्स पर्यंतची ही घरे १८ ते ७० लाख रूयपे किमतीची आहेत.
टाटा होम्सची घरे विक्रीसाठी स्नॅपडीलशी भागीदारी
टाटा हौसिगचे वरीष्ठ उपाध्यक्ष ए. हरिकेश या संदर्भात म्हणाले की गतवर्षी डिसेंबरपासून आम्ही आमच्याच वेबसाईटवरून घरे विक्रीची सुरवात केली असून त्यात आत्तापर्यंत ६०० घरे विकली गेली आहेत. स्नॅपडीलशी भागीदारी हे पुढचे पाऊल आहे. स्नॅनडीलमार्फत घर खरेदी करणार्या ग्राहकास घर भाड्याने द्यायचे असेल तर दर महिना १० हजार रूपये भाडे खात्रीने मिळेल आणि हा करार १ वर्षासाठी असेल. अर्थात त्यासाठी ग्राहकाला घर खरेदी करण्यापूर्वी स्नॅपडील बरोबर नोंदणी करावी लागणार असून त्याची सुरवात २८ ऑगस्टपासून झाली आहे.
टाटा हौसिग मार्च २०१५ पूर्वी दिल्ली एनसीआर आणि कोलकाता या शहरातही घरे बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
