मुंबई आणि उपनगरात लय भारी पाऊस

paus
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून दक्षिण मुंबईत जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस आहे.

दादर, परळ भागातही काही ठिकाणी पाणी साचले असून हार्बर रेल्वेची लोकलसेवा 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. मध्य रेल्वेची वाहतुकही पाच मिनिटे उशीराने सुरू आहे. पाणी साचल्यामुळे गोरेगाव, अंधेरीतही रस्ता वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही जोरदार पाऊस होतो आहे, मात्र अशा पावसातही ऑफिस गाठण्यासाठी चाकरमान्यांची तयारी आहे.

Leave a Comment