
मुंबई – नाराज काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचा सेना प्रवेशाचा सिलसिला सुरूच असून सत्ताधारी आघाडीतील दोन राणेसमर्थक तर एक सुशीलकुमार शिंदे समर्थकाने सेनेत प्रवेश घेतला केला आहे.
आणखी दोन राणे समर्थक शिवसेनेत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला अखेरचा दंडवत करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आहे. कोकणातील कधी काळी नारायण राणेंचे दोन खंदे समर्थक माजी आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
२००५ साली राणेंसोबतच बने यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता, पण काँग्रेसमध्ये संधी मिळत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा स्वगृही परतल्याचे म्हटले आहे. तसेच पंढरपूरातील काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी काँग्रेसला हात दाखवला आहे.
काळे हे सुशिलकुमार शिंदे आणि हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. काळे माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला.
