कोल्हापूर बंदने मुख्यमंत्र्यांचे स्वागत

toll
कोल्हापूर – टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर बंदची हाक देऊन कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केल्यामुळे यामुळे मुख्यमंत्र्यांना दौऱ्यात समितीच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

४८९ कोटी रुपयांच्या थेट पाईप लाईन योजनेचा आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री भुमिपूजन करणार असल्यामुळे काळंम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला होणार थेट पाणीपूरवठा करण्यात येणार आहे.

मात्र टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर बंदची हाक देऊन प्रशासनासमोर आव्हान उभे केले असून शिवसेना कोल्हापूर शहरातून रॅली काढत या बंदला अप्रत्यक्षपणे पाठबळच दिले आहे. मात्र या बंदमधून जीवनाश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

कृती समिती मुख्यमंत्र्याचे स्वागत टोलच्या प्रश्नावर टोलविरोधी कृती समिती कोल्हापूर बंद ठेऊन करणार आहे. बंदच्या प्रश्नावर तब्बल सातव्यांदा कोल्हापूर बंद ठेवणार आहे. या बंदच्या पार्श्वभुमीवर कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Leave a Comment