आव्हाडांनी केला राष्ट्रध्वजाचा अवमान

jitendra-awahad
नाशिक – राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते तथा महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी लेखी तक्रार भाजपाकडून करण्यात आली असून भाजप कार्यकर्त्यांनी नाशिकमधील विश्रामबाग पोलीस ठाण्यात ही तक्रार केली.

दहीहंडी उत्सवा दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी डोक्याला राष्ट्रध्वज बांधला होता. यामुळे हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. अशा प्रकारे राष्ट्रध्वज शरीरावर धारण करणे हे कायदेशीर शिक्षेस पात्र असल्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी भाजपने पोलिसांकडे केली आहे.

Leave a Comment