
मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून जागावाटपाबाबत चर्चा केली असून जागावाटपाचा अंतिम निर्णय २७, २८ आणि २९ तारखेला होणा-या बैठकीत ठरेल. जागावाटपात अधिक जागा मागणे काही गैर नाही असे मेटे म्हणाले.
महायुतीत फक्त स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना घ्या – मेटे
आघाडीच्या नेत्यांना युतीत सामावून घेण्यास राजु शेट्टी आणि जानकर यांनी विरोध केला होता. मात्र, जे नेते स्वच्छ प्रतिमेचे असतील त्यांना महायुतीत घेण्यास काही हरकत नसल्याचे मेटे यांनी सांगितले.
