पुण्यातील पेट्रोलपंप नाही होणार बंद

petrol-pump
पुणे – राज्यभरातील पेट्रोल पंप चालकांनी मुंबई वगळता बेमुंदत बंदची हाक दिली असून या बंदमध्ये पुण्यातील पेट्रोलपंप संघटनेत उभी फूट पडल्यामुळे उद्यापासून होणाऱ्या प्रस्तावित बंदमध्ये पुण्यातील पेट्रोलपंप चालक सहभागी होणार नाहीत.

पुणे पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment