
मुंबई – मुंबईतील लोक गेल्या काही वर्षापासून पाण्यासह हवेतून उडणार्या विमान सेवेची आतूरतेने वाट पाहात होते त्यांची अखेर आज इच्छा पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील पहिले व्यवसायिक सी प्लेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. आज मुंबईत याचे उद्घाटन झाले.
अवघ्या अर्ध्या तासात पोहचा मुंबईहून लोणावळयाला
जूहू येथे आज या सी प्लेनचा शुभारंभ झाला. मुंबईच्या जुहूपासून ते लोणवळा येथील पैना डॉमपर्यंत या सी प्लेनचा प्रवास असेल. आठवड्यातून तीन दिवस या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
३ हजार रुपयांत या सी प्लेनची सफर करता येणार आहे. या सी प्लेनमुळे मुंबई ते लोणवळा हे अंतर अवघ्या अर्धा तासात पार करता येणार आहे.

