नायजेरीयातही इस्लामिक स्टेट स्थापनेची घोषणा

abubakar
बोको हरम या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या व अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषणा केलेला अबू बकर शेकू याने इशान्य नायजेरीयातील कांही भाग इस्लामिक खलिफा म्हणजे इस्लामिक स्टेट असल्याची घोषणा केली असून तसा व्हिडीओ प्रकाशित केला आहे.

आयएसआयएसने इराक आणि सिरीयाच्या कांही भागावर ताबा मिळवून हा भाग इस्लामिक स्टेट असल्याची घोषणा केल्यानंतर इस्लामिक स्टेट घोषणेचा हा दुसरा प्रकार आहे.

अबू बकर शेकूने जारी केलेल्या व्हिडीओत त्याने ग्वोझावर वर्चस्व मिळवून इस्लामिक स्टेट स्थापनेची संधी दिल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने महिन्यापूर्वीच बोको हरम दहशतवाद्यांनी ग्वोझावर कब्जा केल्याचे जाहीर केले होते. या भागातून प्रवास करणे धोक्याचे बनले असून तेथे मोबाईल सिग्नल येत नाहीत असेही समजते. नायजेरियन नागरिकांनी लष्करी कारवाईची मागणीही केली आहे मात्र सैन्याने अत्याधुनिक शस्त्रे नसल्याचे सांगून या कारवाईस नकार दिला असल्याचेही समजते.

Leave a Comment