दरड कोसळल्याने ६ ठार

land-slide
काठमांडू- सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये दोन ठिकाणी दरडी कोसळल्या असून यात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून तीन जण बेपत्ता झाले. मध्य आणि पश्चिम नेपाळमधील तळयाकाठच्या पर्यटनस्थळाजवळ या दुर्घटना घडल्या.

आज सकाळी नेपाळमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली व पावसामुळे फेवा तळयाकाठच्या पोखरा या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर दरड कोसळली. यामध्ये तीन जण ठार झाले तर एक हॉटेल कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ढिगा-यातून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात नेपाळ लष्कर आणि पोलिसांना यश आले.

तर पूर्व काठमांडूत सिंधुपालचौक जिल्ह्यातील खामरे गावातील बरंफी १ येथील घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण बेपत्ता झाले.

Leave a Comment