बबनराव घोलपांचे राजकीय जीवन आले संपुष्ठात!

baban-rao
मुंबई – शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य बबनराव घोलप यांचे ‘राजकारण’ संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून घोलप यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी घालण्यात आली असून राज्यपाल के. शंकरनारायण यांनी बबनराव घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश जारी केला आहे. भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षाही त्यांना ठोठावण्यात आल्यामुळे घोलप यांचे सध्याचे आमदारपद 21 मार्च 2014 पासून संपुष्ठात आले आहे. इतकेच नाही तर भविष्यात त्यांना संसदेची किंवा राज्य विधिमंडळाची कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांचे राजकीय जीवन संपुष्ठात आले आहे.