महसूलमंत्र्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्याने फेकली शाई

balasaheb
अहमदनगर – आधी हसन मुश्रीफ, नंतर हर्षवर्धन पाटील आणि आता बाळासाहेब थोरातांवर शाईफेक करण्यात आली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोराता यांच्यावर अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात शाईफेक करण्यात आली असून थोरात गाडीत बसत असताना हा सर्व प्रकार घडला. दरम्यान शाईफेक करणारा भाऊसाहेब हासे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. वाकचौरेंवर झालेल्या हल्ल्यातही भाऊसाहेब हासेचा समावेश होता अशी माहिती मिळते आहे.

Leave a Comment