महिन्यानंतर भारताचे मंगळयान मंगळावर

isro
चेन्नई – भारताचे मंगळयान मंगळापासून केवळ नऊ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोघन संस्थे(इस्रो)ने दिली असून भारताची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिम आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ही मोहीम यशस्वी होण्यास केवळ एका महिन्याचा अवधी उरला आहे.

इस्रोने फेसबुकद्वारे या अभियानाची माहिती दिली असून मंगळयान मंगळ ग्रहापासून केवळ नऊ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे तर पृथ्वीपासून १८९ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. मंगळयान मंगळावर पोहोचण्यास केवळ ३३ दिवस बाकी आहेत. इस्त्रोने मंगळ मोहिमेतील पहिली मार्गक्रमण दुरुस्ती (ट्रॅजेक्टरी करेक्शन मोनोव्हरू) ११ डिसेंबर २०१३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली होती.

पाच नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून मंगळयानाने यशस्वी उड्डान केले होते. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करुन मंगळयानाने मंगळाकडील प्रवास सुरु केला आहे. तब्बल ३०० दिवसांचा प्रवास करुन हे यान सप्टेंबर २०१४मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.यासाठी ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

Leave a Comment