आयएसआयएस साठी जल्लादच्या कामास युवतीची तयारी

isis
लंडन -इस्लामिक स्टेट स्थापन करून आतंक माजविणार्‍या आयएस्रआयएस साठी जल्लादाचे काम करण्याची तयारी ब्रिटनमधील २२ वर्षीय युवतीने दाखविली आहे. खदिजा डेर असे नांव सांगणार्‍या या युवतीने सोशल नेटवर्कवरून आपली इच्छा व्यक्त करतानाच ब्रिटीश आणि अमेरिकन नागरिकांना ठार करण्याची आपली इच्छाही व्यक्त केली आहे. इराक आणि सिरीयातील इस्लामिक स्टेटसाठी काम करण्यास ब्रिटनमधील युवक मोठ्या संख्येने जात असल्याने तेथील सरकार यावर गंभीर पावले उचलण्याचा विचार करत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान केमेरून यांनी सिरीया आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या विदेशी दहशतवादी लढवय्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर खदिजा ने मुहाजिराह फी शाम म्हणजे सिरीयातील अप्रवासी या नावाने आपले अकौंट सुरू करून त्यावरून वरील इच्छा प्रकट केली आहे. तसेच सिरीयात पाश्चिमात्यांचा गळा घोटण्याची तयारी दर्शविली आहे. अमेरिकी पत्रकार फोलेचा शिरच्छेद करणारा दहशतवादी ब्रिटीश नागरिकच असल्याचे स्कॉटलंड यार्डच्या तपासात सिद्ध झाले असून त्याचे नांव जॉन असल्याचे समजते. त्यामुळे ब्रिटनमध्ये आयएसआयएस समर्थकांचा शोध जारीने केला जात आहे. सुमारे ५०० हून अधिक युवक आयएसआयएस समर्थक म्हणून काम करत असावेत असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.