मायक्रोसॉफ्ट विंडोज ९ चा प्रिव्ह्यू

windows
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या आगामी विंडोज ९ चा प्रिव्हयू सप्टेंबरच्या ३० तारखेला रिलीज करण्याचे जाहीर केले असून त्याचे नामकरण थ्रेशहोल्ड असे करण्यात आले आहे. विंडोज ९ चे व्यावसायिक व्हर्जन पुढील वर्षात म्हणजे २०१५ च्या मध्यास लाँच केली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या विंडोजमध्ये कोरटाना व्हर्जन आहे. विंडोज आठ चा प्रिव्ह्यू फेब्रुवारी २०१२ ला रिलीज केला गेला होता मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना ते आक्टोबर २०१२ मध्ये उपलब्ध झाले होते. तसेच विंडोज ९ चा प्रिव्ह्यू सप्टेंबरमध्ये रिलीज केला जात असला तरी ग्राहकांना प्रत्यक्ष वापरासाठी कधी उपलब्ध होणार याचा कोणताही खुलासा केला गेलेला नाही. तसेच त्याचे मोबाईल व्हर्जन कधी येणार याविषयीही कांही सागितले गेलेले नाही.

Leave a Comment