अजित पवार, तटकरे पुन्हा सिंचन घोट्याळ्यात?

ajit
मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात सिंचन घोटाळा प्रकरणात तपास करण्याची परवानगी अँटी करप्शन ब्युरोने राज्यसरकारकडे मागितली असल्याचे वृत्त आहे. यामुळे हे दोन्ही नेते पुन्हा घोटाळ्यात अडकणार काय अशी चर्चा राज्यात सुरू झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगांवकर यांनी या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोकडे पवार, तटकरे आणि कोंकण सिंचन विकास महामंडळाचे कांही अधिकारी यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरी झाल्याची तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत सिंचन प्रकल्पासाठी परवानग्या देताना नियमांची पायामल्ली झाल्याचा आरोप केला गेला आहे. तीन पेक्षा अधिक प्रकल्पांची कंत्राटे एकाच ग्रुपला नियमाप्रमाणे देता येत नसतानाही दिली गेली आहेत. तसेच प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली पर्यावरण मंजुरी न घेताच प्रकल्प सुरू केले गेले आहेत. शिवाय पुरेशी अर्थिक तरतूद नसतानाही प्रकल्पास परवानगी दिली गेली व त्यामुळे प्रकल्प रेंगाळले आणि त्यांच्या खर्चात प्रचंड वाढ झाल्याचे याटेगांवकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

या सर्व प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वाटेगांवकर यांनी केला असून त्यावेळी सिंचन पाटबंधार मंत्री असलेले पवार व त्यानंतर तटकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे.

Leave a Comment