
मुंबई – अंगणवाडी केंद्रासाठी देशभरात पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी २६ लाख ८४ हजार ५५७ कर्मचा-यांची आवश्यकता असून २४ लाख ४८ हजार ९३६ पदे भरली असताना अद्यापही दोन लाख ३५ हजार ६२१ पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.
देशभरातील अंगणवाडी केंद्रात २,३५,६२१ पदे रिकामी
केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणा-या एकात्मिक बाल विकास योजनेची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात आलेली असून स्थानिक प्रशासकीय अधिका-यांचे दुर्लक्ष आणि कायदेविषयक अडचणींमुळे या रिक्त जागा भरण्यात अडचणी येत असल्याचे पत्र सूचना कार्यालयातर्फे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
या रिक्त जागा भरण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे वारंवार दिले जातात. मात्र स्थानिक प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासिन असल्याने बाल विकास कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे राबवला जात नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
