
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सीमाभागातील येळळूरमधील ग्रामस्थांच्या घरात घुसून कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीची गंभीर दखल घेत न्यायालयाने कर्नाटक पोलिसांची दडपशाही गंभीर असल्याचे म्हटले आहे.
कर्नाटक पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने झापले
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान येळळूर प्रकरणाचीही दखल घेतली. कानडी पोलिसांना येळळूरप्रकरणी न्यायालयाने झापले असून याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने 6 आठवडयात आपले म्हणणे न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
