माऊलींच्या पंढरीत बहुजन पुजा-याच्या हस्ते झाली पूजा

pandharpur
पंढरपूर : पंढरपूरात पहिल्यांदाच ब्राम्हणेतर पुजा-याच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची यानिमित्ताने अंमलबजावणी करण्यास मंदिर समितीने प्रारंभ केला आहे.

15 जानेवारी 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने बडवे आणि उत्पातांच्या जोखाडातून पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणीला मुक्त केले होते. त्यानंतर बहुजन समाजातील पुरूष व महिला पुजा-याच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यामधून 10 जणांची निवड करण्यात आली. उर्मिला भाटे यांनी विठ्ठल-रूक्मिणीची षोडशोपचारे पूजा करून इतिहासात नव्या पर्वाला सुरूवात केली. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्याहस्ते अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Leave a Comment