कानडी पोलिसांनी उधळली दिवाकर रावतेंची पत्रकार परिषद

raote
बेळगाव : शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी येळ्ळूर येथे सीमाभागात मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांकडून झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आयोजित केलेली पत्रकार परिषद कानडी पोलिसांनी दादागिरी करीत उधळून लावली.

जे काय तुम्हाला बोलायचे आहे ते तुमच्या महाराष्ट्रात जाऊन बोला, अशी अरेरावीची भाषा करीत कानडी पोलिसांनी रावते यांना तंबी दिली. रावते यांनी कानडी पोलिसांच्या मुजोरपणाचा तीव्र शब्दात निषेध केला असून कानडी पोलिसांच्या या दडपशाहीचा विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनीही निषेध केला आहे.

Leave a Comment