पेट्रोलच्या दरात कपात

petrol
नवी दिल्ली – सार्वजनिक तेल पुरवठा करणा-या कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटलमागे १.०९ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात मात्र प्रति लिटर ५६ पैशांनी वाढ करण्यात आली.

गुरुवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. गेल्या साडेतीन महिन्यात पेट्रोलमध्ये दुस-यांदा कपात करण्यात आली आहे.

सध्या दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७३.६० रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलच्या दरात कपात केल्याने आता नागरिकांना पेट्रोलसाठी ७२.५२ रुपये द्यावे लागणार आहेत. तर डिझेलच्या दरात ५७.८४ रुपयांवरुन ५८.०४ रुपयांपर्यत वाढ करण्यात आली आहे.