माळीण दुर्घटना ; धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांचे पुनर्वसन – मुख्यमंत्री

prithviraj-chavan
मुंबई – दरड कोसळून दुर्घटना होऊ नयेत म्हणून माळीण गावाप्रमाणे जी काही राज्यातील ठिकाणे आहेत, तेथील नागरिकांना दुस-या ठिकाणी हलवण्यात येईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले .

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळणी गावावर डोगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४४ घरे दरडीखाली गेली आहेत.माळीण गावाप्रमाणे राज्यात पुन्हा अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून अशा धोकादायक ठिकाणी राहणा-या नागरिकांना तातडीने दुस-या ठिकाणी हलवण्यात येईल आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी तज्ञ व्यक्तींशी चर्चा करुन त्यावर निश्चित असे धोरण तयार केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

माळीण गावात एनडीआरएफचे ३००अधिक जवान युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्यात गुंतले आहेत. मात्र पाऊस आणि चिखलामुळे त्यात अडथळे निर्माण होत असल्याचे चव्हाण म्हणाले.

Leave a Comment